Home कोरोना आपत्तीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे थेट कोकणात दाखल

आपत्तीग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे थेट कोकणात दाखल

कोकणातील महाड, खेड, चिपळूण आदी विविध पूरग्रस्त भागांना भेट देत, नागरिकांशी साधला संवाद

महाड दि. 1 ऑगस्ट : 
मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने कोकणातील महाड, चिपळूणची पार वाताहात केली आहे. इथल्या शहरी भागांबरोबरच गावांमध्येही पुराने मोठे नुकसान केले असून इथल्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे जीवनावश्यक वस्तूंची मदत घेऊन थेट कोकणात दाखल झाले आहेत. शिवसेना डोंबिवली शहर शाखा आणि शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या पुढाकाराने कोकणातील पूरग्रस्त महाड, खेड, चिपळूण आदी भागातील नागरिकांच्या मदत सेवेकरिता अन्नधान्य, चादरी,  चटई, कपडे, भांडी, शेगडी, पिण्याचे पाणी यासोबत विविध जीवनावश्यक वस्तूंनी भरगच्च भरलेले एकूण १६ ट्रक आणि १ एसटी महामंडळाची बस कोकणात दाखल झाली आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महाड, खेड, चिपळूण आदी भागातील विविध गावांतील पूरग्रस्त भागाचा दौरा करून तेथील पुरग्रस्तांना मदतीचे वाटप केले जात आहे. त्याचबरोबर पूराच्या पाण्यामुळे वाहून आलेला कचरा, गाळ,  घाणीतून साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनांनुसार ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आणि टीडीआरएफ जवानांच्या मदतीने महाड शहरात स्वच्छता आणि निर्जंतूकीकरणाचे करण्याचे कामही युध्दपातळीवर सुरु आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक प्रशासनासह महाड येथील विविध पूरग्रस्त भागांना भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाजवळ डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने पूरग्रस्त बांधवांकरिता आरोग्य शिबीर सुरु असून या शिबिरालाही खासदार डॉ. शिंदे यांनी भेट दिली. या मोफत आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणीनंतर रुग्णांना लागणारी सर्व औषधे मोफत दिली जात आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा