Home ठळक बातम्या टाटासारखी कॅन्सरची अद्ययावत ओंको थेरपी (सर्व प्रकारची) आता कल्याणात उपलब्ध

टाटासारखी कॅन्सरची अद्ययावत ओंको थेरपी (सर्व प्रकारची) आता कल्याणात उपलब्ध

 

कल्याण दि. १९ जानेवारी :
कॅन्सरवरील रुग्णांवर उपचार करणारे मुंबईतील टाटा हॉस्पिटल आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता या हॉस्पिटलच्या धर्तीवर कॅन्सर रुग्णांवर केले जाणारे उपचार आता कल्याणातही उपलब्ध आहेत. कॅन्सर आणि रक्तविकार तज्ञ डॉ. अमित घाणेकर हे घाणेकर केमो-डे केअर सेंटरच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत. आज आपण जाणून घेऊ या या केमो डे केअर सेंटरबद्दल. (Treatment like Tata Hospital now in Kalyan Dr. Also available at Ghanekar Chemo Day Care Centre)

कॅन्सरवरील केमो थेरपी (chemo therapy) उपचार म्हणजे नेमके काय ?
केमो थेरपी म्हणजे एक प्रकरची जहाल केमिकल्स आहेत. जी कॅन्सरच्या पेशींवर मारा करताना आपल्या शरीरातील चांगल्या पेशींवरही त्याचे परिणाम (side effects of chemo therapy) होत असतात. केमो थेरपी ही एक मोठी शृंखला असून प्रत्येक रुग्णासाठी ती वेगवेगळ्या प्रकारची असते. रुग्णाच्या गरजेनुसार कधी एक डोस तर कधी वेगवेगळे डोस एकत्र करून त्याचा वापर केला जातो. रुग्णाचे वय, त्याच्या कॅन्सरचा प्रकार, तो किती पसरला आहे त्याचे प्रमाण, रुग्णाची शारीरिक क्षमता आदी निकषांवर केमो थेरपी (chemo therapy) ठरत असते. त्याचे फायदे आणि शरीरामध्ये होणारे परिणामही लक्षात घेऊनच केमो थेरपी (chemo therapy) उपचार केले जातात. कॅन्सर म्हणजे शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ असून त्याच्यावर वेळीच योग्य उपचार न झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका संभवतो अशी शक्यता डॉ. अमित घाणेकर यांनी व्यक्त केली.

केमो थेरपी (chemo therapy) व्यतिरीक्त आणखी काय उपचार आहेत?
वैद्यकीय क्षेत्रात कॅन्सरवरील उपचारांबाबत गेल्या दशकभरात झालेल्या संशोधनामुळे आपण आता पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप चांगल्या प्रकारचे औषधोपचार करू लागलो आहोत. ज्यामध्ये इम्यूनो थेरपी (imuno therapy), हार्मोनाल थेरपी (harmonal therapy) , टार्गेटेड थेरपी (targeted therapy) आणि ओरल टिकेआयएस (oral TKIS) अशा महत्वपूर्ण उपचारांसोबतच विविध पद्धतींचा वैद्यकीय क्षेत्रात वेगाने विकास होत आहे. पारंपारिक केमो थेरपीच्या (chemo therapy) तुलनेमध्ये हे उपचार अत्यंत परिणामकारक असून त्यामुळे इतर पेशींवर परिणाम होण्याची शक्यता (side effects) फार कमी असते. या उपचार पध्दतींचे साईड इफेक्ट कमी असले तरी आपण त्याचा उपचार करण्यापूर्वीच अंदाज बांधू शकतो. तर परिणामांचा विचार केला असता या नव्या पद्धती केमो थेरपीपेक्षा (chemo therapy) अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरतात. त्यामुळे योग्य वेळेत या सर्व नव्या पद्धतींचे उपचार करणे हे कॅन्सर रुग्णाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे असल्याचेही डॉ. घाणेकर यांनी स्पष्ट केले.

 

कॅन्सरचे डे केअर केमो थेरपी (day care chemo therapy center) सेंटर म्हणजे नेमके काय? रुग्णाला त्याचा काय उपयोग?
कॅन्सर उपचारांसाठी डे केअर ही संकल्पना आपण विकसित देशांकडून घेतलेली आहे. कॅन्सरचे झालेले निदान हे केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक बाब असते. कॅन्सरवर केमो थेरपीद्वारे (chemo therapy) केले जाणारे उपचार ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. मात्र डे केअर सेंटरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या उपचारामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांचा वेळ, खर्च आणि मुख्यतः मानसिक त्रास वाचण्यास मोठी मदत होते. आणि एका सकारात्मक विचाराने ते या सर्व प्रक्रियेला सामोरे जातात. आमच्याकडील डॉक्टर्स आणि इतर सर्व स्टाफ हा अत्यंत चांगल्या प्रकारे प्रशिक्षित असून केमो थेरपीसाठी (chemo therapy) लागणारे वैद्यकीय साधने आणि साहित्यही अत्युच्च दर्जाचे असल्याचेही डॉ. घाणेकर यांनी सांगितले.

आपल्याकडे असणाऱ्या केमो थेरपी आणि स्काल्प कुलिंग मशीनचे (scalp cooling) फायदे काय?
आमच्या डे केअर सेंटरमध्ये कॅन्सर उपचारांवरील दोन महत्वाची अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मशीन आहेत. त्यातील पहिले मशीन जे आहे त्याद्वारे केमो थेरपीचे (chemo therapy) औषध बनवण्यासाठी वापरण्यात येणारे लामिनल फ्लो केमो थेरपी (chemo therapy) डिव्हाईस. ज्याद्वारे कॅन्सर रुग्णाला केमो थेरपी (chemo therapy) चे औषध अत्यंत शुद्ध आणि परिणामीकारक बनवण्यात या मशीनचा सिंहाचा वाटा ठरतो. तर दुसरे मशीन हे स्काल्प कुलिंग नावाचे मशीन आहे. केमो थेरपीमध्ये (chemo therapy) रुग्णांची केस गळती ही टाळता न येण्यासारखी आहे. मात्र या केस गळतीमुळे रुग्णांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. तर अनेक जन केस गळतील म्हणून केमो थेरपीला (chemo therapy) नकार देतात. अशा रुग्णांसाठी हे स्काल्प कुलिंग मशीन हे नक्कीच वरदान ठरेल असा विश्वासही डॉ. अमित घाणेकर यांनी यावेळी व्यक्त केला

कॅन्सर नसणाऱ्या रक्तविकारांवर (blood diseases) आपल्याकडून काय उपचार केले जातात?
सर्वच रक्तविकार काही कॅन्सर नसतात. अनेकदा असे निदर्शनास आले आहे की हे रक्तविकार म्हणजे साधे ऍनिमियादेखील नाहीयेत. बऱ्याच लोकांचे रक्त भरायला लागते, काही जणांच्या प्लेटलेट कमी असल्याने त्यानं फिटनेसमध्ये अडथळा निर्माण होतो ज्यामुळे सर्जरी करता येत नाही. तर काही लोकांच्या पांढऱ्या पेशी खूप वाढलेल्या असतात तर काही जणांचा सीबीसी पूर्णपणे बिघडलेला असतो. त्यामुळे कॅन्सर नसलेले अशा प्रकारचे जे रक्तविकार असतात ते वेळीच तपासण्या करून उपचार घेणे आवश्यक असते. कारण योग्य वेळी त्याचे निदान झाल्यानंतर ते रक्तविकार उपचार करून बरे होऊ शकतात. अशा परिस्थितीत आम्ही साधारणपणे बोन मॅरोच्या (bone marrow) तपासणीचा सल्ला देत असतो. बोन मॅरो म्हणजे माकड हाडामध्ये सुई टाकून आपण काही ठराविक तपासण्या केल्यानंतर आपल्याला चटकन त्याचे निदान सापडण्यास मदत होत असल्याचे डॉ. अमित घाणेकर यांनी यावेळी सांगितले.

पत्ता : डॉ. घाणेकरर्स केमो डे केअर सेंटर,
ए -205, देसाई कॉम्प्लेक्स, येवले चहाच्या वर,
बैल बाजार चौक, कल्याण – प.
मोबाईल – 9920018399

मागील लेखडोंबिवलीजवळील खोणी गावात रानगव्याचे दर्शन ; व्हिडिओ व्हायरल
पुढील लेखकल्याण डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता घसरली ; कल्याणचा एक्यूआय 275 तर डोंबिवलीचा 235 वर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा