Home क्राइम वॉच राज्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेडद्वारे बोगस आधारकार्ड बनवणारे दोघे गजाआड

राज्यमंत्र्यांच्या बनावट लेटरहेडद्वारे बोगस आधारकार्ड बनवणारे दोघे गजाआड

 

डोंबिवली दि.14 फेब्रुवारी :

राज्यमंत्री  रवींद्र चव्हाण यांचे बनावट लेटरहेड, सही शिक्के वापरून बनावट आधारकार्ड बनवून त्याद्वारे लोकांकडून हजारो रुपये उकळणाऱ्या दुकलीचा डोंबिवलीमध्ये भांडाफोड झाला आहे. याप्रकरणी अशोक काठे व अनिल सिंदकर या दोघांविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील रामनगर ट्राफिक ऑफिसच्या मागे व डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड शिवसेना शाखेजवळ नेट फॉर यु सायबर कॅफेमध्ये बनावट आधारकार्ड बनवले जात असल्याची माहिती भाजप नगरसेवक राजन आभाळे यांना मिळाली होती. याबबत शहानिशा करण्यासाठी आभाळे यांनी वैभव गवस या तरुणाला त्या ठिकाणी आधारकार्ड बनवण्याच्या बहाण्याने पाठवले. त्याठिकाणी अशोक काठे व अनिल सिंदकर या दुकलीने वैभवला आधारकार्ड बनवून देतो असे सांगत हजार रुपये खर्च सांगितला. पुढे त्यांनी वैभवला नेट फॉर यु सायबर कॅफेमध्ये घेवून गेले. त्याठिकाणी चक्क राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लेटरहेड तयार करत त्यावर त्याचा फोटो चिटकवून बनावट शिक्के मारत खोटी सही केली. हा सर्व प्रकार पाहून वैभव यांना धक्का बसला. त्या दोघांना जाब विचारत या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून  पोलिसांनी अशोक काठे व अनिल सिंदकर या दोघावर गुन्हा दाखल केलाा आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*