Home ठळक बातम्या कल्याणच्या गौरी पाडा तलावाजवळ दोन बगळ्यांचा मृत्यू; तपासणीसाठी नमूने प्रयोगशाळेत रवाना

कल्याणच्या गौरी पाडा तलावाजवळ दोन बगळ्यांचा मृत्यू; तपासणीसाठी नमूने प्रयोगशाळेत रवाना

कल्याण 12 जानेवारी :
2 दिवसांपूर्वी ठाण्यात काही बगळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज कल्याणातही 2 बगळ्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील गौरी पाडा तलाव परीसर हा प्रकार घडला आहे.
बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीचा उपाय घेतला जात असतानाच ठाण्यापाठोपाठ कल्याणातही पक्षांचा मृत्यू झाल्याने डोकेदुखी वाढली आहे. या दोन्ही बगळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजलेले नसले तरी बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर यावर ठोस भाष्य करणे चुकीचे ठरेल.
दरम्यान याबाबत माहिती मिळताच राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत पक्ष्यांचे नमुने गोळा केले. पुढील तपासणीसाठी हे नमुने पुण्यातील किंवा मुंबईतील पशु वैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती शासनाच्या पशुवैद्यकीय विभागातील डॉ. विलास चौधरी यांनी दिली. तर या प्रकारानंतर केडीएमसीचा आरोग्य विभागही सतर्क झाला असून बगळे मरून पडलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची तपासणी सुरू केली आहे. पुढील 1 -2 दिवसांत या बगळ्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा