Home ठळक बातम्या वन्यजीवप्रेमींच्या तत्परतेमूळे मदारीच्या तावडीतून दोन माकडांची सुटका

वन्यजीवप्रेमींच्या तत्परतेमूळे मदारीच्या तावडीतून दोन माकडांची सुटका

 

कल्याण दि.8 डिसेंबर :
वन्यजीवप्रेमींच्या तत्परतेने माकडाच्या छोट्या जखमी पिलासह दोन माकडांची मदारीच्या तावडीतून सुटका करण्यात आली. वन्यजीवप्रेमींनी या माकडांना वनविभागाच्या ताब्यात दिले असून वैद्यकीय तपासणी आणि उपचार करून सोडून देण्यात येणार आहे.

कल्याण पश्चिमेच्या लालचौकी येथील शाळेसमोर आज सकाळी ९.३० च्या सुमारास प्राणीप्रेमी डिंपल शहा यांना एक मदारी दोन माकडांसोबत खेळ करत असल्याचे दिसून आले. या माकडांची मदारीकडून सुटका करण्याच्या हेतूने त्यांनी वन्यजीवरक्षक सुहास पवार यांना बोलावले. त्यावर सुहास पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दोन्ही माकडांपैकी मोठ्या माकडाच्या शरीरावर विविध रंगांचे स्प्रे मारून आणि गळ्यात घुंगरांचा पट्टा अडकवून खेळ करून घेतले जात होते. तर माकडाच्या लहान पिल्लाच्या शेपटीजवळ जखम झाल्याचे पवार यांना आढळुन आले. या दोन्ही माकडांना दोरीने बांधून मदारीकडून अविरत खेळ सुरू होता.

दरम्यान पवार यांनी याबाबत कल्याणचे वन-अधिकारी राजू शिंदे यांना फोनवरून प्राथमिक माहिती देत या दोन्ही माकडांना वनविभागाच्या ताब्यात दिले. या माकडांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करून तसेच तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांना निसर्गमुक्त केले जाणार असल्याची माहिती सुहास पवार यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा