Home ठळक बातम्या डोंबिवलीत रेल्वेची संरक्षक भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी

डोंबिवलीत रेल्वेची संरक्षक भिंत कोसळून दोन जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी

 

डोंबिवली दि.21 सप्टेंबर :
नविन संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू असतानाच बाजूला असणारी जुनी संरक्षक भिंत अंगावर कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची आणि तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील सिद्धार्थ नगर परिसरात दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नविन संरक्षक भिंतीचे काम सुरू असतानाच जुनी भिंत अंगावर पडली आणि काम करणारे पाच जण त्याखाली अडकले. इथला आरडा ओरडा ऐकून शेजारील परिसरात देवीचा मंडप बांधण्याचे काम करणाऱ्या किशोर भिसे, दत्ता म्हात्रे, श्रावण माने, लेखन पैठणे, रोहित इंगळे, सतीश जोशी आदींनी घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या कामगारांना ढिगाऱ्यातू बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.

या घटनेतील जखमींना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मागील लेखअट्टल चोरट्यांना खडकपाडा पोलिसांकडून बेड्या; 18 गुन्हे उघड तर 11 बाईक हस्तगत
पुढील लेख‘मुले पळवणारी टोळी’ ही निव्वळ अफवा – डीसीपी सचिन गुंजाळ

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा