Home ठळक बातम्या उद्धव ठाकरेंनी आपली सासुरवाडी सांभाळली पाहिजे – मनसे आमदार राजू पाटील यांचा...

उद्धव ठाकरेंनी आपली सासुरवाडी सांभाळली पाहिजे – मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला

कल्याण ग्रामीण दि.२८ ऑक्टोबर :

एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना त्याकडे नेतृत्वाने लक्ष दिले पाहिजे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोंबिवली ही सासुरवाडी आहे, त्यांनी ती सांभाळायाला हवी असे सांगत मनसे आमदार राजू पाटील यांनी टोला लगावला आहे. शिवसेनेची डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखा ताब्यात घेण्यावरून काल पुन्हा वादंग झाला. त्यावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आमदार पाटील यांनी हा टोला लगावला आहे.

शाखा कोणाच्या ताब्यात असायला पाहिजे, नसायला पाहिजे तो सर्वस्वी त्या दोन्ही गटांचा प्रश्न आहे. परंतु आपल्याला वाटते की डोंबिवली ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सासुरवाडी आहे, त्यांनी ती संभाळायला पाहीजे. एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वाने देखील लक्ष दिले पाहिजे असे सांगत एक कार्यकर्ता म्हणून आपण ही भावना मांडत असून आपला त्या गोष्टींशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केजरीवालांनी मागणी केली त्याच आश्चर्य वाटलं…
केजरीवालांसारख्या व्यक्तीने अशी मागणी केली त्याचे आश्चर्य वाटलं, जो माणूस एवढे चांगलं काम करतो, त्याला चांगला बोलायला काही हरकत नाही, शाळांचा चांगला कायापालट त्यांनी दिल्लीत केला आहे. ते पण असे भावनिक राजकारण करायला लागले याचं वाईट वाटत असल्याचे मत आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.

इंधनाच्या किंमती ज्या वाढल्याने त्याचा एकत्रित परिणाम सर्व गोष्टींवर होत असून सर्व गोष्टी महाग होत आहेत. बळी राजावर पावसाची अवकृपा झाली असून शेतकरी सुखी नाहीये. आपल्याकडे चांगले रस्ते नाही, चांगली आरोग्यवस्था नाही आणि अशा वेळेस आपण कशावर भांडतो आणि राजकारण करतोय तर नोटांवर फोटो कोणता पाहिजे असे सांगत आमदार पाटील यांनी सध्याच्या राजकारणातील मर्मावर बोट ठेवले. तर लोक त्रासले आहेत, त्यांच्या भावनांकडे कोणाचे लक्ष नसून एवढं असंवेदनशील होऊन आपण राजकारण करतोय, ते थांबलं पाहिजे यासाठी आपण ते ट्विट केल्याचेही आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा