Home ठळक बातम्या केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात दाल सरोवराच्या काठावर योग...

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात दाल सरोवराच्या काठावर योग प्रात्यक्षिके

 

श्रीनगर दि.२१ जून :
श्रीनगर येथील जगप्रसिद्ध दाल सरोवराच्या काठावरील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (एसकेआयसीसी) येथे झालेल्या योग प्रात्यक्षिक सोहळ्याचे नेतृत्व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून करण्यात आले. या योग प्रात्यक्षिकात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही सहभाग घेतला.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना, केंद्र सरकारने आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून `ब्रँड इंडिया ॲट ग्लोबल स्टेज’वर लक्ष केंद्रीत केले आहे. देशातील ७५ प्रतिष्ठित ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पंचायती राज विभागाच्या वतीने हरिद्वारमधील हर की पौडी व श्रीनगरमधील दाल सरोवर येथे मुख्य कार्यक्रम आयोजित केला होता. तर देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींतही योग दिन साजरा करण्यात आला.

दाल सरोवर येथे झालेल्या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरातील पंचायती राज संस्थांचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा