Home कोरोना कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या (16जुलै) 22 ठिकाणी लसीकरण; मिळणार केवळ 2रा डोस

कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या (16जुलै) 22 ठिकाणी लसीकरण; मिळणार केवळ 2रा डोस

 

कल्याण -डोंबिवली दि.15 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या 16 जुलै रोजी 22 ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. त्यापैकी डोंबिवलीतील वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुल आणि कल्याण पूर्वेतील प्रबोधनकार ठाकरे या केंद्रांवर कोवॅक्सिनचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे. तर उर्वरित 20 लसीकरण केंद्रांवर कोवीशिलडचा केवळ 2रा डोस लससाठा उपलब्ध असेपर्यंत उपलब्ध राहणार असल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले आहे.
यासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार असून ऑफलाइन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

१ कॉमेंट

Leave a Reply to Shridhar प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा