Home कोरोना केडीएमसी क्षेत्रात उद्या (9 ऑगस्ट) 4 ठिकाणी लसीकरण ; कोव्हीशिल्डचे डोस मिळणार

केडीएमसी क्षेत्रात उद्या (9 ऑगस्ट) 4 ठिकाणी लसीकरण ; कोव्हीशिल्डचे डोस मिळणार

 

कल्याण – डोंबिवली दि.8 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या 9 ऑगस्ट रोजी 4 ठिकाणी लसीकरण केले जाणार असून कोव्हीशिल्डची लस दिली जाणार आहे. कल्याणात आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण, (प.) आणि डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पू.) याठिकाणी कोव्हीशिल्डचे 1ला आणि 2 रा असे डोस दिले जाणार आहेत. तर कोळसेवाडी येथील केडीएमसीच्या 14 आणि 15 क्रमांकाच्या शाळेमध्ये तसेच मोहने लसीकरण केंद्रांवर कोव्हीशिल्डचा केवळ 2रा डोस दिला जाणार आहे.

यासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहेत. तर ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा