Home कोरोना केडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (27 ऑगस्ट) 28 ठिकाणी लसीकरण

केडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (27 ऑगस्ट) 28 ठिकाणी लसीकरण

 

कल्याण – डोंबिवली दि.26 ऑगस्ट :
केडीएमसीतर्फे उद्या 27 ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिवलीमध्ये 28 ठिकाणी कोवीड लसीकरण केले जाणार आहे. त्यापैकी आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण, (प.) आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पू.) या 2 ठिकाणी ‘कोविशिल्ड’ लसीचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे.

तर आर्ट गॅलरी, लाल चौकी ,कल्याण(प) आणि सावळाराम क्रीडा संकुल, डोंबिवली येथे कोवॅक्सिन लसीचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे. ही 4 केंद्र वगळता उर्वरित 24 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा 1ला आणि 2 रा डोस दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

या लसीकरणासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होतील. तसेच ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्याकरिता, आधार कार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहितीही केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

2 कॉमेंट्स

  1. Online slot already showing booked befor 10 or ontime 10 clock kdmc not capable to give vaccines to people government stock not available all day but privet hospital stock available every day, why ??

    Our pm sir said & hanging banner free vaccine in india where it is I am not find any one person in dombivali kalyan said he has hassle free vaccination

Leave a Reply to Ganesh sawant प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा