Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्याही महापालिकेतर्फे होणारे लसीकरण बंदच राहणार

कल्याण डोंबिवलीत उद्याही महापालिकेतर्फे होणारे लसीकरण बंदच राहणार

 

कल्याण – डोंबिवली दि.1 जुलै :
कल्याण डोंबिवलीतील लसीकरणामागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या संपयाचे नाव घेत नाहीये. त्यामुळेच उद्या म्हणजेच शुक्रवारी 2 जुलै रोजीही महापालिकेतर्फे होणारे कल्याण डोंबिवलीत लसीकरण बंद राहणार आहे. शासनाकडून लस पुरवठा न झाल्याने हे लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाने दिली आहे.

उद्या लसीकरण बंद राहण्याचा सलग चौथा दिवस असणार आहे. या आठवड्यात केवळ सोमवारीच कल्याण डोंबिवलीत 25 ठिकाणी रेकॉर्डब्रेक असे 12 हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले होते. त्यानंतर मंगळवारपासून लसींअभावी लसीकरणाला लागलेला ब्रेक काही केल्या सुटायचे नाव घेत नाहीये. परिणामी लसींसाठी अक्षरशः चातकाप्रमाणे डोळे लावून बसलेल्या कल्याण डोंबिवलीकरांना लस कधी मिळणार हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.

मागील लेखडोंबिवलीत रस्त्यावर पडलेल्या खड्डयांविरोधात मनसेचे आंदोलन
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 85 रुग्ण तर 136 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा