Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्या (6जुलै) होणार 8 ठिकाणी लसीकरण

कल्याण डोंबिवलीत उद्या (6जुलै) होणार 8 ठिकाणी लसीकरण

 

कल्याण-डोंबिवली दि. 5 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्या 8 ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. कल्याणात आचार्य अत्रे रंगमंदिर (1ला आणि 2ऱ्या डोससाठी), लालचौकी आर्ट गॅलरी ( 2ऱ्या डोससाठी), प्रबोधनकार ठाकरे केंद्र नेतीवली, गुरुनानक शाळा रामबाग, मोहने लसीकरण केंद्र, रेल्वे शाळा या 6 ठिकाणी तर डोंबिवलीमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यगृह (1ला आणि 2ऱ्या डोससाठी) आणि वै. सावळाराम म्हात्रे महाराज क्रिडा संकुल या 2 ठिकाणी हे लसीकरण सुरू राहणार आहे. यापैकी आचार्य अत्रे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे कोविशील्ड लसींचा 1ला आणि 2रा डोस दिला जाणार आहे. तर उर्वरित सहा ठिकाणी कोविशील्डचा केवळ दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

लसीकरणासाठी आज रात्री 10.00 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार आहेत. तर याठिकाणी ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधारकार्डची झेरॉक्स कॉपी केंद्रांवर जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा