Home Uncategorised प्रारंभची ‘वाळवी’ मुंबई केंद्राच्या एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत

प्रारंभची ‘वाळवी’ मुंबई केंद्राच्या एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत

मुंबई दि.4 ऑक्टोबर :
पनवेलमधील प्रारंभ ग्रुपच्या ‘वाळवी’ एकांकिकेने ‘प्रयोग मालाड’ आयोजित एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

मुंबईतील मालाड येथे ‘लेखक एक नाट्यछटा अनेक’ ही एकांकिका स्पर्धा पार पडली. त्यामध्ये मुंबई केंद्राच्या प्राथमिक फेरीत १८ एकांकिका सादर करण्यात आल्या. त्यामध्ये अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या सहा एकांकिकांमध्ये ‘वाळवी’ चाही समावेश आहे. या स्पर्धेचं वैशिष्टय म्हणजे सादर होणाऱ्या सर्व एकांकिका लेखक जयंत पवार यांनी लिहलेल्या आहेत. या स्पर्धेची अंतिम फेरी १३ आणि १४ ऑक्टोबर २०१८ रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात होणार असून त्यात पुणे,सोलापूर आणि नाशिक केंद्रांमधून निवडल्या गेलेल्या एकांकिकांचाही सहभाग असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*