Home ठळक बातम्या कल्याणात पारंपरिक आणि देखण्या पद्धतीने साजरा झाला विजयादशमीचा सोहळा

कल्याणात पारंपरिक आणि देखण्या पद्धतीने साजरा झाला विजयादशमीचा सोहळा

अयोध्या पुनरागमनाच्या देखाव्याने जिंकली सर्वांचीच मने

कल्याण दि.६ ऑक्टोबर :
कल्याण पश्चिमेच्या गांधारी परिसरात विविध गृहनिर्माण संस्था आणि सामाजिक संस्थांमार्फत विजयादशमीचा सोहळा पारंपरिक तसेच अत्यंत देखण्या स्वरूपात साजरा झालेला पाहायला मिळाला. प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वनवासानंतर अयोध्या पुनरागमनाचा देखावा यावेळी सादर करण्यात आला.

कल्याण पश्चिमेच्या गांधारी परिसरातील रुतू संकूल- महाविर संकूल , राॅयस संकूल आणि विदान फाऊंडेशनच्या संयुक्त हा उपक्रम राबवण्यात आला. कोवीडमूळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर होणाऱ्या या सोहळ्यामध्ये चांगलीच उत्सुकता जाणवत होती. गांधारी परिसरातील रूतू संकूलाच्या मंदिर परिसरात हा विजयादशमी सिमोल्लंघनाचा उत्सव सामाजिक बांधिलकी – एकता आणि परंपरा जोपासत साजरा करण्यात आला.

ज्यामध्ये महाविर संकूलातील चिमुरड्यांनी सादर केलेल्या प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वनवासानंतर अयोध्या पुनरागमनाच्या देखाव्याने सर्वांचीच मने जिंकली. तर या गृहसंकूलातील महिला मंडळाने पारंपारिक वेशात सादर केलेली लेझीमची प्रात्यक्षिकंही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तर या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी कोविड काळात केलेल्या बहूमोल सेवेसाठी रुग्णालयाच्या डांँ तेजपाल शहा, डाॅ. आस्था, डाँ रितू मिसार, डाॅ अविनाश चटप, डाँ सीमा पाटील, डाॅ य़ोगेश पाटील यांच्यासह तिथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकर फडके, संस्कार भारतीचे जिल्हाअध्यक्ष भूषण कर्णिक, स्थानिक समाजसेवक संजय कारभारी, शत्रुघ्न भोईर, विष्णु सांगळे, अन्वेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर फडके, अनिरुध्द मेंंडकी, पंकज आणेकर, संदीप बोबडे, मानसी मेंडकी, अमृता आणेकर, सोनाली बोबडे, संजय कारभारी, संदीप राहितकर, जितेंद्र मुरांजन, विलास आव्हाड, साहिल महाजन, अमित जोशी, तेजस लटके, अन्वेश जोशी यांनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा