Home ठळक बातम्या कल्याण शहर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी विमल ठक्कर

कल्याण शहर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी विमल ठक्कर

कल्याण दि.1 फेब्रुवारी :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये काँग्रेस पक्षही पाठी नाही. येणाऱ्या निवडणुकांचा विचार करता कल्याण शहर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विमल ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी ठक्कर (वसाणी)यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेत काँग्रेस पक्षाची जाहीर सभा झाली होती. त्यावेळी इथल्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाकडून सर्वतोपरी बळ देण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर विमल ठक्कर (वसाणी) यांच्यापासून त्याला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

विमल ठक्कर यांनी एनएसयुआय च्या (नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया) सचिवपदी काम केल्याचा अनुभव असून युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष म्हणून दोन वेळा निवडून आले होते. त्यामूळे पक्षाने आपल्याला सोपवलेल्या जबाबदरीला साजेसे काम करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नवनियुक्त उपाध्यक्ष विमल ठक्कर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*