Home क्राइम वॉच डोंबिवलीत 2 हजारांच्या बनावट नोटा छापल्याप्रकरणी तरुणाला अटक

डोंबिवलीत 2 हजारांच्या बनावट नोटा छापल्याप्रकरणी तरुणाला अटक

डोंबिवली दि.25 फेब्रुवारी :

डोंबिवलीमध्ये 2 हजार रुपयांच्या 25 बनावट नोटांप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी नवी मुंबईतील तरुणाला अटक केली आहे. एका बँकेच्या कॅश डिपॉझिटरी मशीनमध्ये या नोटा भरण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे बनावट नोटा छपण्याची ही आयडिया या तरुणाने यु ट्युबवरील व्हिडीओ पाहून सुचल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली.

 

भूषण साळुंखे असे या तरुणाचे नाव असून तो नवी मुंबईतील कामोठे येथे भाजी विक्रीचा व्यावसाय करतो. तर सुकेश बंगेरा डोंबिवलीत बाईक स्पेअर पार्ट विक्रीचे काम करतो. भूषणला सुकेशला 50 हजार रुपये द्यायचे होते. त्यासाठी त्याने सुकेशला 50 हजार रुपये दिले. दिले. सुकेशने एका बँकेच्या कॅश डिपॉझिटरी मशीनच्या माध्यमातून हे पैसे जमा केले. मात्र बँकेच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी तडक पोलीस ठाण्यात धाव घेतली. विष्णूनगर पोलिसांनी सुकेशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याला हे पैसे भूषणने आपल्याला दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यांनतर पोलिसांनी भूषणला अटक केली असता हा सर्व बनावट नोटांचा प्रकार समोर आला. या बनावट नोटांसह पोलिसांनी त्या प्रिंटिंग करणारे मशीनही ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
#fakeCurrency #

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*