Home ठळक बातम्या डोंबिवली शिळ रोड परिसरातून जखमी माकडाला वाचविण्यात वॉर संस्थेला यश

डोंबिवली शिळ रोड परिसरातून जखमी माकडाला वाचविण्यात वॉर संस्थेला यश

 

डोंबिवली दि.18 नोव्हेंबर :
डोंबिवली शीळ रोडवरील लेक शोर परिसरात एका माकडाने गेल्या काही दिवसांपासून उच्छाद घातला होता. या माकडाला स्थानिक नागरिक अन्न आणि फळे देत असल्याने हे माकड तेथून जाण्यास तयार नव्हते. त्यातच काही लोकांच्या घरात फळे न मिळाल्याने चिडलेले हे माकड जबरदस्तीने घरात घुसून नासधूस करू लागले. माकडाच्या या उच्छादामुळे भयभीत झालेल्या स्थानिक नागरिकानी अखेर वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क साधत या माकडापासून सुटकेसाठी मदत मागितली.

वनपाल मच्छिंद्र जाधव, वनरक्षक रोहित भोई आणि योगेश रिंगने यांनी प्रथम पाहणी करत वॉर संस्थेचे प्राणीमित्र विशाल कंथारिया यांच्या मदतीने नागरिकांमध्ये जनजागृती केली. या माकडाला अन्न किंवा फळे देऊ नये तसेच त्याला नागरिकांनी त्रासही न दिल्यास ते स्वतःहून निघून जाईल अशा सूचना वनविभाग आणि वॉर संस्थेकडून स्थानिकांना देण्यात आल्या होत्या.

दरम्यान हे जखमी माकड स्थानिक रहिवाशाच्या फ्लॅटमध्ये शिरून नासधूस करत असल्याची माहिती विशाल यांना मिळाली. त्यांनी तत्काळ वनविभागाकडे याबाबत माहिती दिली आणि त्यांच्या परवानगीने वॉर संस्थेच्या टीमने जखमी माकडाला सुरक्षितरित्या पकडुन वनविभागाकडे सुपूर्द केले. याप्रसंगी स्थानिक रहिवासी बिनु अलेक्स आणि सतीश बोर यांनीही मदत केली.

या माकड बचाव मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे, विशाल कंथारिया, स्वप्नील कांबळे, महेश मोरे, कुलदीप चिकणकर, यांनी खूप मेहनत घेतली. तर प्रेम आहेर, पार्थ पाठारे, सुहास पवार तसेच वनविभागाचे वनपाल मच्छिंद्र जाधव, वनपाल दिलीप भोईर, वनरक्षक योगेश रिंगने आणि रोहित भोई यांचेही मार्गदर्शन लाभले. या जखमी माकडाला वैद्यकीय उपचारासाठी पुढे पाठवणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी सांगितले.

मागील लेखकल्याण डोंबिवली महापालिकेच्या 18 नोव्हेंबर 2021 रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती
पुढील लेखमहाविकास आघाडी सरकारविरोधात डोंबिवलीत भाजपचा जनआक्रोश मोर्चा

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा