Home Uncategorised कल्याण पश्चिमेतील मोहल्ल्यात पाण्याची चणचण

कल्याण पश्चिमेतील मोहल्ल्यात पाण्याची चणचण

कल्याण दि.22 मार्च :
मार्च महिना संपण्यास आठवडा शिल्लक असतानाच कल्याणातील काही भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. कल्याण पश्चिमेच्या महानगरपालिका मुख्यालयाजवळील आंबेडकर नगर आणि आझाद फरीद चाळीतही पाण्याची मोठी चणचण जाणवू लागली आहे. याठिकाणी टँकरमधून पाणी भरण्यासाठी होणाऱ्या गर्दीचे चित्रच इथल्या पाण्याची समस्येबाबत सर्व काही सांगून जाते. या परिसरातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*