Site icon LNN

येत्या शुक्रवारी (२२ मे)कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बारा तास बंद; पावसाळा लांबण्याच्या शक्यतेने पाणी नियोजन

या आठवड्यातील दुसरी पाणी कपात

कल्याण डोंबिवली दि.१९ मे:
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या शुक्रवारी २२ मे रोजी कल्याण डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा १२ तास बंद राहणार आहे. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. (Water Supply Planning Amid Delay in Monsoon; Kalyan-Dombivli Water Supply to Remain Shut for 12 Hours This Friday (May 23))

भारतीय हवामान खात्याने यावर्षी एल निनो आणि आयओडी (Indian Ocean Dipole) च्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागासोबत १४ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार, आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी सर्व महानगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि संबंधित प्राधिकरणांनी समन्वयाने पाणी कपात करण्याचे ठरविले आहे.

त्याअनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा येत्या शुक्रवारी २२ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १२ तास बंद राहणार आहे.

‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद…
या पाणी कपातीचा परिणाम कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण भागावर होणार आहे. ज्यामध्ये मांडा-टिटवाळा, वडवली,आंबिवली, शहाड, अटाळी आणि परिसरातील इतर गावांचा समावेश आहे.

Exit mobile version