Home ठळक बातम्या येत्या मंगळवारपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पाणीकपात सुरू

येत्या मंगळवारपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पाणीकपात सुरू

कल्याण दि.17 ऑक्टोबर :
राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने पुढील वर्षभरासाठी केलेल्या पाण्याच्या नियोजनानुसार येत्या मंगळवारपासून कल्याण डोंबिवलीत पाणीकपात केली जाणार आहे. पुढील वर्षभर म्हणजेच 21 ऑक्टोबर 2018 ते 15 जुलै 2019 पर्यंत दर मंगळवारी ही पाणीकपात असेल. सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी रात्री 12 असे चोवीस तास कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दरम्यान राज्य शासनाची ही पाणीकपात लागू होण्यापूर्वीच कल्याण डोंबिवलीत काही ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*