Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा महिन्यातून 2 दिवस राहणार बंद

कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा महिन्यातून 2 दिवस राहणार बंद

कल्याण/डोंबिवली दि.5 मार्च :
कल्याण डोंबिवली (kalyan dombivli)  शहरांचा पाणीपुरवठा (water supply) महिन्यातून 2 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. उल्हास नदीतील पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या (2ऱ्या) आणि चौथ्या (4थ्या) मंगळवारी हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या (kalyan dombivli municipal oration)पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत असा 24 तास हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. उल्हास नदीतील पाण्याचे नियोजन करण्याबाबत जानेवारी महिन्यात पाटबंधारे विभागाची एक बैठक झाली होती. त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता महिन्यातून 2 दिवस कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे.

मागील लेखसॅटिस प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांकडून कल्याण स्टेशन परिसराचा पाहणी दौरा
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 210 रुग्ण तर 98 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा