Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणीपुरवठा बंद राहणार

येत्या मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणीपुरवठा बंद राहणार

 

कल्याण-डोंबिवली दि.12 नोव्हेंबर :
येत्या मंगळवारी 16 नोव्हेंबर रोजी कल्याण डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा 12 तास बंद राहणार आहे. केडीएमसीच्या मोहने उदंचन केंद्राजवळील रॉ वॉटर चॅनेलमधील गाळ काढण्यासह मोहिली उदंचन , जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या फिडरच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. या कामामुळे कल्याण पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण तसेच डोंबिवली पूर्व -पश्चिमेला होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा