Site icon LNN

येत्या मंगळवारी (18 नोव्हेंबर 2025) कल्याण पूर्व – पश्चिमेचा पाणीपुरवठा 9 तास बंद

बारावे जलशुद्धीकरण केंद्रात पॅनल सर्व्हिसिंगचे काम

कल्याण दि.१८ नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहेन उच्‍छन केंद्रातील आरओ वॉटर चॅनेलमधील गाळ काढणे, तसेच बारावे जलशुद्धीकरण केंद्रातील २२ केव्ही एच.टी. आणि ३.३ केव्ही पॅनल सर्व्हिसिंगची महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

ही कामे करण्यासाठी येत्या मंगळवारी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० (एकूण ९ तास) बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा कल्याण पूर्व आणि पश्चिमेचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांना पूर्वतयारी म्हणून पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन केडीएमसीकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version