Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी २८ जुन रोजी कल्याण पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा राहणार...

येत्या मंगळवारी २८ जुन रोजी कल्याण पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा राहणार बंद

 

कल्याण दि. २४ जुन :
येत्या मंगळवारी २८ जुन २०२२ रोजी कल्याण पूर्व आणि पश्चिम भागांचा पाणीपुरवठा १२ तास बंद ठेवण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहीली जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. परिणामी २८ जुन रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत कल्याण पूर्व – कल्याण भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा