Site icon LNN

येत्या मंगळवारी (11 नोव्हेंबर 2025) कल्याण टिटवाळ्यातील या भागांचा पाणी पुरवठा 12 तास राहणार बंद

कल्याण दि.11 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत – यांत्रिकी उपकरणाची तसेच “अ” प्रभागक्षेत्रातील मांडा-टिटवाळा परिसरामधील मोहिली जलशुध्दीकरण केंद्राच्या वितरणाच्या व्यवस्थेतील जलवाहिन्यांची दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. (Water supply to these areas in Kalyan Titwala will be closed for 12 hours on Tuesday (November 11, 2025)

त्यामुळे येत्या मंगळवारी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत असा तब्बल १२ तास पुढील भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ज्यामध्ये कल्याण पूर्व – पश्चिम विभागातील काही भाग, तसेच कल्याण ग्रामीण विभागातील मांडा टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी , कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावांचा समावेश आहे.

तरी या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version