Home ठळक बातम्या शिवसेनेबरोबर युतीसाठी आम्ही सकारात्मक – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

शिवसेनेबरोबर युतीसाठी आम्ही सकारात्मक – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

कल्याण दि.14 नोव्हेंबर :
शिवसेनेबरोबर युती झाली पाहिजे. आम्ही त्यासाठी सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कल्याणात केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दानवे कल्याण लोकसभेतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी युतीबाबत आम्ही सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार केला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा दौरा करून निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सक्रिय केले जात आहे. तर युती झाली नाही तर मतविभाजनाचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल. हे मतांचे विभाजन टळले पाहीजे असे सांगत एकीकडे युतीसाठी आग्रही आणि दुसरीकडे स्वबळाची जोरदार तयारी सुरू असल्याचे दानवे यांच्या बोलण्यावरून जाणवले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे आम्ही स्वागत करतो. ते एका चांगल्या गोष्टीला मदत करत असल्याचेही रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले. तर आमदार अनिल गोटे यांची नाराजीही लवकरच दूर केली जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*