Home ठळक बातम्या आम्ही आघाडी धर्म पाळतोय, मात्र त्यांच्या मनात काय ते माहित नाही –...

आम्ही आघाडी धर्म पाळतोय, मात्र त्यांच्या मनात काय ते माहित नाही – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

 

कल्याणमध्ये झाली राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक

कल्याण – डोंबिवली दि.12 फेब्रुवारी :
आघाडी धर्म पाळणे हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. आम्ही आघाडी धर्म पाळतही आहोत आणि जाहीरपणे सांगतही आहोत की आघाडी करूया. आता त्यांच्या मनात काय आहे हे सांगण्यासाठी आपण काही ज्योतिषी नसल्याचे विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कल्याणात केले. आगामी केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कल्याणात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

कोणताही निर्णय घेण्यासाठी ही आढावा बैठक नव्हती. तर एकंदर परिस्थिती काय आहे ? कार्यकर्त्यांमधील उत्साह काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी ही आढावा बैठक झाल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवलीमध्ये विकास हरवल्यासारखा दिसतोय. आपल्याला तो कुठेही दिसत नाहीये. तुम्हाला कुठे दिसत असल्यास आपल्याला तिकडे घेऊन चला अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

तर सध्या देशभरात हिजाबवरून निर्माण झालेल्या गदारोळाबाबत बोलताना ते म्हणाले की लोकांनी काय घालावं, काय खावं? कोणता पेहराव घालावा, हे ठरवणारे तुम्ही कोण? त्यापेक्षा केंद्र सरकारमध्ये मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंगसाठी एक मंत्री नियुक्त करा, म्हणजे हे सगळे प्रश्न मिटून जातील असा सल्लाही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला.

दरम्यान कल्याणात झालेल्या राष्ट्रवादीच्य या आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, आनंद परांजपे, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा