Home ठळक बातम्या हिंदुत्व आणि विकास समांतर पुढे घेऊन जायचे आहे – आमदार रविंद्र चव्हाण

हिंदुत्व आणि विकास समांतर पुढे घेऊन जायचे आहे – आमदार रविंद्र चव्हाण

भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून डोंबिवलीत जंगी स्वागत

डोंबिवली दि.७ जुलै :
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला त्यांच्या वागणुकीतून पक्षासाठी त्याग आणि समर्पण भावनेचा आदर्श घालून दिला आहे. त्याच आदर्शावर आपण एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणं आवश्यक असून ते करत असताना हिंदुत्व आणि विकास हे समांतर नेण्याचे धोरण आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे असे उद्गार आमदार रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत काढले.

शिवसेना भाजपा सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यात सुरत ते गुवाहाटी अशी ऑपरेशन कमळची मिशन कंट्रोलर ही कामगिरी बजविल्यानंतर रविंद्र चव्हाण आज डोंबिवलीत परतले. भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने त्यांचे आज जोरदार स्वागत करण्यात आले.

पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर ती तन मन धनाने पूर्ण करणे हेच एक कार्यकर्ता म्हणून ध्येय ठेवले. सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतील एक छोटी जबाबदरी मला दिली आणि त्या जबाबदारीने मला मोठं केलं असं फार तर मी म्हणेन असे प्रतिपादनही आमदार चव्हाण यांनी यावेळी केले.

तर संयम हीच भाजपा कार्यकर्त्याची खरी ताकद असून सत्तेमुळे जबाबदारीचे भान ठेवा असा सल्लाही चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. नरेंद मोदीजींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे. त्यामुळे समर्पण भावनेने पक्षाची आणि जनतेची कामे करत रहा असा पुनरुच्चारही आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा