Site icon LNN

“नागरीकांनी दाखवलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही”

कल्याण डोंबिवली दि.3 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी आमच्यावर दाखवलेल्या इतक्या मोठ्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही. कल्याण डोंबिवली शहराच्या विकासासाठी अधिकाधिक काम करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास नवनिर्वाचित महापौर ॲड.हर्षाली थविल – चौधरी यांनी व्यक्त केला. महापालिका सभागृहात पीठासीन अधिकारी आंचल गोयल (मा.जिल्हाधिकारी, मुंबई शहर) यांच्या अध्यक्षतेखाली महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी ॲड. हर्षाली थविल – चौधरी महापौर म्हणून तर राहुल दामले यांची उपमहापौर म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर सभागृहातील सहकाऱ्यांशी संवाद साधताना महापौर चौधरी यांनी हा विश्वास व्यक्त केला. (“We Will Not Let the Trust Shown by Citizens Be Broken”)

जनतेची कामे व्यवस्थित होणे गरजेचे आहे, यासाठी सर्वांची साथ असावी. परंतु नागरीकांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आपल्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे सोनं करेन अशा शब्दात महापौर हर्षाली चौधरी यांनी उपस्थितांना आश्वासित केले.

तर एकमेकांच्या हातात हात घालून समन्वयाने कल्याण डोंबिवलीला पुढे नेऊया अशा शब्दांत नवनिर्वाचित उपमहापौर राहुल दामले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपापल्या पदांचा कार्यभार ग्रहण केला.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह अनेक मान्यवरांकडून नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर यांचे अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version