कल्याण| ५ जुलै :
महानगर गॅस आणि महावितरणच्या कामांनंतर कल्याण पश्चिमेच्या बेतुरकर पाडा परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अनेक लहान-मोठे अपघातही घडत होते. (When Civic Authorities Failed, Local Corporator Steps In: Dangerous Potholes in Beturkar Pada Filled at Personal Expense)
या गंभीर समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नगरसेवक शामल मंगेश गायकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने मनुष्यबळ उपलब्ध करून खड्ड्यांमध्ये भराव टाकण्याचे काम करून घेतले. यावेळी स्थानिक भाजप नगरसेविका हेमलता पवार याही उपस्थित होत्या.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांना घटनास्थळी बोलावून रस्त्याची झालेली दुर्दशा तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कायमस्वरूपी रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

