Home ठळक बातम्या कल्याण शिळफाटा ते पुजा पंजाब हॉटेल रस्त्याचे काम तातडीने करा – मनसे...

कल्याण शिळफाटा ते पुजा पंजाब हॉटेल रस्त्याचे काम तातडीने करा – मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

डोंबिवली दि.17 नोव्हेंबर :

कल्याण शिळ फाटा ते पुजा पंजाब हॉटेल एमआयडीसी सर्विस रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना त्रास होत आहे. नवी मुंबईकडे जाणाऱ्या आणि कल्याणकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्याने तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. तरी हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

याच रस्त्याच्या कामाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राठोड यांची भेट घेतली आणि त्यांना पत्र सुद्धा दिले आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून हे काम येत्या 1 महिन्याच्या कालावधी पूर्ण होईल असे आश्वासन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिले आहे. तर हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे खड्डे तातडीने भरण्याची सूचना आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा