Home ठळक बातम्या डोंबिवलीत मॅनहॉलमध्ये गुदमरून तिघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

डोंबिवलीत मॅनहॉलमध्ये गुदमरून तिघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

 

डोंबिवली दि.26 ऑक्टोबर :

मेनहोल साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज डोंबिवलीत घडली. हे तिघंही कंत्राटी कामगार असल्याची माहिती समोर आलीये. देविदास पाजगे, महादेव झोपे आणि चंद्रभान अशी या तीन मृत कामगारांची नावं आहेत.

आज संध्याकाळी चारच्या सुमारास डोंबिवलीच्या खंबाळपाडा एमआयडीसी परिसरात रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या मेनहोलची सफाई करण्यासाठी हे तिघं आले होते. यावेळी त्यांच्यापैकी एकजण आतमध्ये उतरला, मात्र तो गुदमरल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार आत गेला, मात्र हे दोघंही आत अडकून पडल्यानं त्यांना वाचण्यासाठी तिसरा कामगार आत गेला आणि या तिघांचाही गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना समजताच फायर ब्रिगेडनं घटनास्थळी धाव घेत या तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, हे तिघे ज्यावेळी मेनहोलच्या सफाईसाठी आत उतरले, त्यावेळी मास्क, सेफ्टी बेल्ट अशा कुठल्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपयोजना करण्यात आल्या नसल्याची बाब समोर आली असून यात दोषी असलेल्या कंत्राटदार आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*