डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने झाला देदीप्यमान सोहळा
डोंबिवली दि.8 मार्च :
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९हजार १११ महिला, विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक।सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी, महिला भगिनी आदींनी एकत्र येत ९,१११ एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला.
या।आधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी दिली. त्या ठिकाणी या आधी ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता, मात्र तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. साडेपाच मिनिटांची विविध प्रात्यक्षिक सादर करून महिलांनी तो।रेकॉर्ड केला. (World Record Set in Dombivli on International Women’s Day; 9,111 Girl Students Create History with Mass Lezim Performance)
त्यावेळी डांगरेकर यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे सर्टिफिकेट, मेडल हस्तांतरीत केले. त्यावेळी रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानत लेझीम ही आपली संस्कृती असून ती टिकवणे हे आपले काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षी शारीरिक व्यायामावर भर देऊन जगासमोर सशक्त भारत कसा असू शकतो हे दाखवून देण्याचा संकल्प सोडला होता, त्या निमित्ताने महिला, विद्यार्थीनी आदींनी एकत्र येऊन हा अनोखा रेकॉर्ड केला याचा मला डोंबिवलीकर म्हणून प्रचंड आनंद आहे, हा रेकॉर्ड मी भारत मातेच्या चरणी समर्पित करतो असे उद्गार काढले.
यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीचे त्यांनी आभार मानत उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आदींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सारा आसमंत भारत माता की जय, जय श्रीराम, वंदे मातरमने दणाणून सोडला होता.
प्रत्येकाच्या चेहऱयावर वर्ल्ड रेकॉर्ड।केल्याचा आनंद ओसंडून वहात होता. लेझीमचा झंकार सर्वत्र निनादत होता, ढोल ताशांच्या गजरात त्या रेकॉर्डचे हजारो डोंबिवलीकरांनी स्वागत केले, आणि प्रत्येकाच्या सहभागीबद्दल कौतुक करण्यात आले. अशा दैदिप्यमान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पहाटेपासून डोंबिवलीकर प्रतीक्षेत होता, अखेर वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा होताच प्रचंड जल्लोषात त्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

