Home ठळक बातम्या सबळ करण्याबरोबरच महिलांना योग्य वागणूकही मिळावी – बिपीन पोटे

सबळ करण्याबरोबरच महिलांना योग्य वागणूकही मिळावी – बिपीन पोटे

कल्याण दि.8 मार्च :
आपल्यातील गुणांच्या बळावर महिलावर्ग प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केलं असून त्यांना सबळ करण्याबरोबरच योजिनती वागणूक देण्याची आवश्यकता असल्याचे मत पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी व्यक्त केले. येथील कै. भाऊराव पोटे विद्यालयात झालेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

केवळ 8 मार्च नव्हे तर रोजचाच दिवस हा महिलांचा असतो. महिलांनी आपल्यातील गुणांच्या आणि जिद्दीच्या जोरावर प्रगती केली आहे. मग त्या गृहिणी असो की नोकरदार असो की व्यावसायिक. या महिला आज घरात जेवढ्या सक्षमपणे कार्यरत आहेत तेवढ्याच नोकरी – व्यवसायातही खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामूळे त्यांच्या सबळीकरणासह योग्य सन्मान, योग्य वागणूक देणेही तितकेच गरजेचे असल्याचे पोटे म्हणाले.

दरम्यान महिला दिनानिमित्त पोटे विद्यालयातर्फे विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त महिलांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये अवघ्या 21 व्या वर्षी सेल्स टॅक्स ऑफिसर बनलेल्या आरती चव्हाण, टीडीसी बँक कल्याण शाखेच्या व्यवस्थापिका चारुलता पवार, डॉ. प्रेरणा मालथनी, ऍड. तृप्ती पाटील, अभिनेत्री प्रतीक्षा साबळे यांचा समावेश होता. महिला दिनाचे औचित्य साधत या सर्वांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला केम्ब्रिआ शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका मीनल पोटे, पोटे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वामन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*