कल्याण, दि. 30 सप्टेंबर :
नवरात्र म्हणजे देवीची उपासना, भक्ती, साधना आणि आनंदाचा उत्सव. याच नवरात्रोत्सवानिमित्त कल्याणच्या कर्णिक रोड येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या प्राथमिक विद्यामंदिरतर्फे “सन्मान नवदुर्गांचा” हा आगळावेगळा उपक्रम उत्साहत पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा शाळेकडून यावेळी शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. (This Goddess is the Goddess of the Universe: “Honor of the Nine Forts” by the Chhatrapati Shikshan Mandal Primary School in Kalyan)
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि देवीपूजनाने झाली.’तूच दुर्गा तू भवानी’ या गीतावर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत वातावरण भक्तीमय बनवले. शाळेतील विद्यार्थिनींनी रंगतदार सुरुवात करून सर्वांची मने जिंकली. तर प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून नारीशक्तीचे महत्व अधोरेखित केले. समाजातील प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी सक्षम योगदान दिले असून त्यांचा सन्मान हा केवळ गौरव नसून पुढील पिढीसाठी प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमामध्ये डॉ.सुरेखा इटकर मॅडम, सुधा जोशी, मंजिरी फडके, स्वामिनी निष्कलानंदा (अम्माजी), शिल्पा सदाशिव चव्हाण, सीमा समीर गांगुर्डे, मीनल पराग जोशी, दीपिका संताजी साळवे, पुष्पा पाडवी, आदिती चौधरी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांना गौरविण्यात आले.
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष महेश देशपांडे सर, प्रमुख पाहुण्या वर्षाताई कोल्हटकर, NEP समन्वयक उर्मिला जाधव, शालेय समिती सदस्य लक्ष्मण अग्रवाल, वसुधा पवार , माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सय्यद मॅडम, पूर्व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका साबळे मॅडम मंचावर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका वेदपाठक मॅडम यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम उत्तम पद्धतीने संपन्न झाला.