Home ठळक बातम्या तरुण वर्गाने देशासाठी मतदान करावे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

तरुण वर्गाने देशासाठी मतदान करावे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण दि.16 एप्रिल :
आताच्या निवडणुकीत तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि देशासाठी मतदान करावे असे आवाहन कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. डोंबिवली पश्चिमेत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीदरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.

या निवडणुकीत जे नविन मतदार आहेत त्यांनी लोकशाहीतील या भव्य उत्सवात निश्चितपणे मतदान करावे. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी मांडलेली नविन भारताची संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा देशात एनडीएचेच सरकार आले पाहीजे असे मत श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

तर डोंबिवली पश्चिमेत काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत बोलताना ते म्हणाले की विजयाच्या रॅलीप्रमाणेच शिवसेना-भाजप-रिपाइंच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. यावरूनच हा युतीवर, नरेंद्र मोदींवर, उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा मतदारसंघ आहे. याठिकाणचा राजकीय इतिहास पाहता इथला मतदार नेहमी युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहिला आहे. यावेळेसही इथल्या मतदारांनी गेल्या 5 वर्षांत याठिकाणी झालेल्या विकासाच्या पाठीशी उभे राहण्याचे निश्चित केल्याचे सांगत गेल्या वेळेपेक्षा अधिक भरघोस मतांनी आपल्याला विजयी करण्याचा संकल्प केल्याचा विश्वासही डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान डोंबवली पश्चिमेतील कोपर गाव,सम्राट चौक, मोठा गाव, स्टेशन रोड, सुभाष रोड, श्रीधर म्हात्रेवाडी, फुले रोड या परिसरात ही प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी श्रीकांत शिंदें यांचे महिलावर्गातर्फे पारंपरिक पध्दतीने आणि उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात होते.

यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, शहरप्रमुख शिवसेना राजेश मोरे, स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांच्यासह सेना-भाजपचे अनेक नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*