Home ठळक बातम्या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सरसावली युवासेना

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी सरसावली युवासेना

डोंबिवली दि.13 जून :
युवासेना प्रमुख तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवली शहर युवासेनेतर्फे स्मशानभूमीत दिवसरात्र कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला.
युवसेनेतर्फे डोंबिवली पूर्व आणि पश्चिम स्मशानभूमीत काम करणाऱ्या 40 ते 50 कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सामानाचे किट आणि आर्थिक मदत करण्यासह अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात फळवाटप आदी उपक्रमही राबवण्यात आले. यावेळी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, डोंबिवली युवासेना विधानसभा अधिकारी राहुल श्रीधर म्हात्रे यांच्यासह सागर दुबे, जाई ढोले, शीतल कारंडे, मयूर म्हात्रे, आणि विपुल म्हात्रे आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा