
महाराष्ट्र शासन, मित्रा, व्हिएसटीएफ आणि WIFA यांचा संयुक्त उपक्रम)
कल्याण, दि. १५ ऑक्टोबर :
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा – युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शनाखाली “प्रोजेक्ट महादेवा”या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे अंडर-१३ मुलं आणि मुलींसाठी जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचण्या घेण्यात येणार आहेत. कल्याण पश्चिमेच्या योगीधाम येथील सुप्रसिद्ध सिटी पार्कमधील एलिट फुटबॉल अरेना याठिकाणी ही निवड चाचणी घेण्यात येणार आहे. येत्या 17 ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत होणाऱ्या या निवड चाचणीमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. (Ambitious Project Mahadev; District level football selection test for boys and girls under 13 years of age will be held in Kalyan)
ही मोहीम *MITRA (Mission for Integrated Training, Research and Awareness)*, *VSTF (Vidyarthi Seva Trust Foundation)* आणि *WIFA (Western India Football Association)* यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून जिल्ह्यातील कौशल्यवान फुटबॉल खेळाडू शोधून त्यांना राज्यस्तरापर्यंत पोहोचवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
या जिल्हास्तरीय निवड चाचण्यांतून पात्र ठरणाऱ्या खेळाडूंना प्रादेशिक निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यानंतर प्रादेशिक निवड चाचणीत निवड झालेल्या खेळाडूंना प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत होणाऱ्या राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.
या उपक्रमाचा प्रमुख हेतू म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील लहान वयातील प्रतिभावान फुटबॉलपटू ओळखणे, त्यांना प्रशिक्षित करणे आणि व्यावसायिक स्तरावर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे असल्याची माहिती एलिट फुटबॉल क्लबतर्फे देण्यात आली.
या खेळाडूंचे मूल्यांकन ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांनी सुचवलेल्या निकषांनुसार करण्यात येणार आहे. यामध्ये खेळाडूंची तांत्रिक कौशल्ये, खेळ समज, फिटनेस आणि एकूणच फुटबॉल बुद्धिमत्ता या बाबींचा विचार केला जाणार आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन तसेच प्रोजेक्ट महादेवाअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाईल. “महाराष्ट्राच्या फुटबॉलचा पाया मजबूत करण्यासाठी – प्रोजेक्ट महादेवाअतिशय महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन..
अध्यक्ष: खा. डॉ. श्रीकांत शिंदे
उपाध्यक्ष: विजय पाटील
**सचिव: सुनील पूजारी
📞 पूर्व नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क: 9930330019 / 9152112115