
दुर्गाडी चौकातील वाहतूक नियंत्रणाचा मुद्दा ऐरणीवर
कल्याण दि.18 एप्रिल.:
कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी चौकात आज सकाळी एक भीषण अपघात झाला. यामध्ये बाईकवर असलेल्या मुलगी आणि वडिलांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती याची माहिती मिळाली नाही. (Terrible accident at Durgadi Chowk, Kalyan; Girl and father’s legs seriously injured)
कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी चौक येथून आज सकाळच्या सुमारास वडील आणि मुलगी हे आपल्या बाईकवरून वाडेघरच्या दिशेने येत होते. त्यासोबतच एक मला मोठा ट्रक आहे कल्याणच्या दिशेने येत होता. या दोन्ही गाड्या चौकात आल्यानंतर अचानक दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि ही गाडी थेट ट्रकच्या चाकाखाली आली येऊन मोठा अपघात झाला. या अपघातात वडील आणि मुलीच्या पायावर न ट्रकचे चाक गेल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांची नावे अद्याप समजली नसून त्यांना उपचारासाठी जवळच्याच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तर या अपघाताप्रकरणी ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी चौक आणि या चौकात चारी दिशेने वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. एकीकडे एकीकडे लालचौकी कडून येणाऱ्या गाड्या आधारवाडीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या गोविंदवाडीकडून येणाऱ्या गाड्या आणि कोनच्या दिशेने येणाऱ्या गाड्या या भरधाव वेगात येत असतात. त्यातच या चौकाजवळ असलेल्या सीएनजी पंपावरही रिक्षा किंवा चार चाकी गाड्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत हा चौक ओलांडून जाणे सगळ्यांसाठीच धोकादायक बनले आहे. विशेषतः नव्या दुर्गाडी पुलावरून येणाऱ्या गाड्या अतिशय भरधाव वेगाने येतात. बऱ्याचदा त्याचे नियंत्रण करणे वाहन चालकांनाही कठीण जाते. या पार्श्वभूमीवर दुर्गाडी पुलासह चौक परिसरातील वाहतुकीच्या वर्दळीचा अंदाज घेऊन स्पीड ब्रेकर आणि रंबलर्स यासारख्या उपाययोजना तातडीने करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.