Home ठळक बातम्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’ यंदा नोव्हेंबर महिन्यात;.ही स्पर्धा शहराचा अभिमान ठरणार असल्याची भाजप...

‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’ यंदा नोव्हेंबर महिन्यात;.ही स्पर्धा शहराचा अभिमान ठरणार असल्याची भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची ग्वाही

डोंबिवलीतील स्पर्धेच्या थीमचे चव्हाण यांच्या हस्ते झाले अनावरण

डोंबिवली दि.4 ऑगस्ट :
गेल्यावर्षी आपल्याच पहिल्याच प्रयत्नात नेटक्या आणि सुनियोजित पद्धतीने आयोजित करण्यात करण्यात आलेल्या डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’च्या तारखेची नुकतीच घोषणा करण्यात आली. कल्याण-डोंबिवली रनर्स आणि ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ९ नोव्हेंबर २०२५ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेच्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले. (”Dombivalikar Friendship Run’ to be held in November this year; BJP state president Ravindra Chavan assures that this competition will be the pride of the city)

ही मॅरेथॉन डोंबिवलीचा अभिमान असून अत्युत्तम नियोजनामुळे येत्या काळात ही स्पर्धा नक्कीच एक बेंचमार्क ठरणार असा विश्वासही रविंद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

संस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवली नगरीमध्ये आरोग्यबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने 2024 च्या म्हणजेच गेल्यावर्षीच्या मैत्री दिनापासून या फ्रेंडशिप रनची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. अतिशय सुनियोजित पद्धतीने आयोजित केलेल्या या पहिल्याच स्पर्धेमध्ये तब्बल 3 हजार 500 हून अधिक धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मात्र पावसाळ्याच्या काळ असल्याने अनेकांची इच्छा असूनही या स्पर्धेमध्ये सहभागी होता आले नसल्याची माहिती आयोजकांना प्राप्त झाली होती. त्याची दखल घेऊन यंदा ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येत असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली.

यावर्षी २१.१ किमी, १० किमी, ५ किमी अशा 3 टप्प्यांत ही अर्धमॅरेथॉन होणार असून १.६ किमी ‘फन रन’ हे त्यातील विशेष आकर्षण असणार आहे. या विविध मॅरेथॉन प्रकारांमध्ये ८ वर्षांच्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण सहभाग घेऊ शकतो. सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, मेडल, ई-सर्टिफिकेटचे वितरण करण्यात येणार असून स्पर्धेदरम्यान विविध बक्षिसेही देण्यात येणार आहेत.

कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेल्या १० वर्षांपासून ‘कल्याण-डोंबिवली रनर्स ग्रुप’ ही संस्था समाजात आरोग्यविषयक जागरूकता आणि अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे.

यावर्षीच्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’मध्ये अनिल कोरवी, दिलीप घाडगे, हरिदासन नायर, धृती चौधरी, सुजाता साहू, गगन खत्री हे विख्यात धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच अंबरनाथ रनर्स फाउंडेशन, बोरगावकर मॅरेथॉन, चॅम्पियन्स स्पोर्ट्स अँड अ‍ॅडव्हेंचर्स, कल्याण रनर्स, मुंब्रा रनर्स, पलावा रनर्स, पियूष फाउंडेशन उल्हासनगर, रनर्स क्लॅन फाउंडेशन, रनहोलिक्स, रनटॅस्टिक दिल से, शिवरत्न अकॅडमी या संस्थांशी निगडित धावपटूंचाही यामध्ये सहभाग असणार आहे.

तरी जास्तीत जास्त शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था आणि सर्व डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन हा आरोग्यसोहळा अधिक भव्य करण्याचे आवाहन रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा