
कल्याण दि.19 ऑगस्ट :
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाने ठाण मांडले असून हवामान खात्याकडून काल आणि आज रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. आणि त्यानुसार पावसानेही मग आज कल्याण तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. आज दिवसभरात कल्याण तालुक्यात घडलेल्या सर्व घडामोडींचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेले हे अपडेट्स….(Rain updates throughout the day; Raita bridge closed for traffic, 204 citizens evacuated and other important information…)
पुर परिस्थिती-
१ मौजे काटई येथे ११ गाळे व १० घरामध्ये पाणी शिरले आहे.
२. मौजे नांदिवली येथे साई कमल सोसायटी येथे तळमजला १६ रूम पाण्याखाली गेला आहे.
३. मौजे काटेमानिवली येथे शिवाजी नगर वालधुनी येथे घरात १२ पाणी शिरले आहे.
.
४. मौजे भोपर येथे नाल्याचे पाणी चाळी मध्ये जाऊन घरांचे १० नुकसान झाले आहे.
५. मौजे काटेमानिवली वृदावण शिवकृपा चाळ महालक्ष्मी शॉपिंग ७ घरात पाणी शिरले आहे.
६. वालधुनी नदी किनारी असलेल्या अशोकनगर ६ घरात पाणी शिरले असुन सदर नागरीक त्यांच्या नातेवाईक यांच्या घरी गेले आहे.
७. मौजे कल्याण ठाणकर पाडा येथे घराची भिंत कोसळली असुन जिवितहानी झालेली नाही.
रस्ते/ रेल्वे वाहतुक
१. उल्हास नदीवरील पुलावर पाणी आल्याने रायते पुलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
२. मौजे दहागांव चंद्रा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत आहे सदर रस्ता बंद करण्यात आला आहे व पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध आहे.
३ मौजे वालकस येथील पुल पाण्याखाली गेला असुन पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध आहे.
४. मध्य रेल्वे वाहतुक बंद आहे.
जिवितहानी : कल्याण तालूक्यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
पशुधनहानी : कल्याण तालुक्यात पशुधनहानी झालेली नाही.
नागरिकांचे स्थलांतर :
कल्याणच्या नेतिवली टेकडी येथे झाड कोसळल्याने 120 नागरिकांची मनपा शाळेत संक्रमण शिबीर व्यवस्था केली आहे.
समता नगर आहिरे गावातील घरे पाण्याखाली गेल्याने 70 नागरिकांचे मनपा शाळेत संक्रमण शिबीर व्यवस्था केली आहे.
काटेमानिवली वृंदावन शिवकृपा चाळीतील 10 नागरिकांचे जायभाय शाळा काटेमानिवली येथे स्थलांतर
काटेमानिवली वालधुनी शिवाजी नगर येथील ४ नागरिकांचे गणपती मंडपात स्थलांतर
(सायंकाळी 5.45 वाजेपर्यंतची माहिती)