Home ठळक बातम्या 5 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन : 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमुर्तीचे विसर्जन कृत्रिम...

5 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन : 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमुर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करा – केडीएमसीचे गणेशभक्तांना आवाहन

 

कल्याण डोंबिवली दि.30 ऑगस्ट :
जलप्रदुषण टाळण्यासह पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार ६ फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे कृत्रिम विसर्जन तलाव, कृत्रिम विसर्जन ठिकाणी करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे. दिड दिवसांच्या गणेशमूर्तीसाठी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी केलेल्या आवाहनाला भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर आता उद्या (31ऑगस्ट 2025) असलेल्या 5 दिवसांच्या गणपती विसर्जनासाठीही पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा हेच आवाहन केले आहे. (Immersion of 5-Day Ganesh Idols: Ganesh devotees are urged by KDMC to immerse idols below 6 feet height in artificial ponds)

जलप्रदूषण रोखण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठिकठिकाणी, महापालिकेच्या दहाही प्रभागात कृत्रिम तलावांची /कृत्रिम विसर्जन स्थळांची उभारणी केली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या विसर्जन स्थळी, नैसर्गिक जलस्त्रोताच्या ठिकाणीही कृत्रिम विसर्जन स्थळाची सुविधा श्री गणेश भक्तांसाठी उपलब्ध‍ करुन देण्यात आल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी स्पष्ट केले.

तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा लाभ घेऊन नागरिक आणि गणेशभक्तांनी पर्यावरण रक्षणासाठी, जलप्रदूषण रोखण्यासाठी आपला हातभार लावून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही अतिरिक्त आयुक्त गायकवाड यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा