Home ठळक बातम्या बळीराजासाठी मदतीचा हात : कल्याणातील मराठी कलाकार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेने...

बळीराजासाठी मदतीचा हात : कल्याणातील मराठी कलाकार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेने घेतला पुढाकार

कल्याण दि.28 सप्टेंबर :
महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पुरामुळे हिरावून घेतल्याने बळीराजावर उदरनिर्वाहाचे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमधील मराठी कलाकारांनी पुढाकार घेत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. (A helping hand for Baliraja: Marathi artists from Kalyan and Akhil Bharatiya Natya Parishad took the initiative)

कल्याणातील कलाकार ऋतुराज फडके, प्रसाद दाणी यांच्याकडून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या माध्यमातून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्यामध्ये विविध खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असल्याचा असल्याची माहिती प्रसिद्ध अभिनेता ऋतुराज फडकेने दिली.

येत्या दसऱ्यापर्यंत ही मदत पाठवण्यात येणार असून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्याचा स्विकार केला जाणार आहे. या मदतीचे संकलन कल्याण पश्चिमेतील शंकरराव झुंजारराव संकुलातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिराच्या तळ मजल्यावर केले जात आहे. ही मदत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्विकारली जाणार असून आपल्या बळीराजाला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मदत करण्याची साद या मराठी कलाकारांनी घातली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क – विशाल पितळे 9833635656

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा