Home क्राइम वॉच कल्याण-डोंबिवलीतील उद्याने आता अधिक सुरक्षित आणि सुशोभितही; सीसीटीव्हीसह डेकोरेटिव्ह लाइटिंगची कामे पूर्ण

कल्याण-डोंबिवलीतील उद्याने आता अधिक सुरक्षित आणि सुशोभितही; सीसीटीव्हीसह डेकोरेटिव्ह लाइटिंगची कामे पूर्ण

कल्याण–डोंबिवली दि.26 नोव्हेंबर :
शहरातील उद्यानांमध्ये वाढती गर्दी आणि त्यातून उद्भवणाऱ्या सुरक्षेच्या समस्यांचा विचार करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने उद्यानांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. अंदाजपत्रकात ज्या कामांना प्राधान्य देण्याचे ठरले होते, त्या सीसीटीव्ही आणि डेकोरेटिव्ह लाइटिंगच्या कामांची अंमलबजावणी आता पूर्ण झाली आहे. (Parks in Kalyan–Dombivli are now safer and more beautiful than ever. The installation of CCTV cameras and decorative lighting has been completed, enhancing both security and aesthetics for citizens)

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी उद्यानांमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी आणि नागरिकांना संध्याकाळी फिरताना सुरक्षित आणि सुखद अनुभव मिळावा यासाठी आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विद्युत विभागाला दिले होते. त्यानुसार विभागाने फास्ट ट्रॅकवर कामे करून उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे.

शहरातील उद्यानांवर आता १७९ सीसीटीव्हीची करडी नजर…
महापालिकेने एकूण १७९ सीसीटीव्ही कॅमेरे विविध उद्यानात बसवले आहेत. यामुळे वॉकर्स, ज्येष्ठ नागरिक, मुलांसोबत येणारे पालक आणि महिला — या सर्वांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे. काही उद्यानांत पूर्वी गर्दुल्ल्यांच्या भटक्या टोळ्या, मद्यप्राशन करणाऱ्यांची गर्दी, वाद-विवाद यांसारख्या समस्या होत्या. आता त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे.

१६७ डेकोरेटिव्ह पोलमुळे उजळून निघाली उद्याने…
संध्याकाळी उद्यानातील अंधारे कोपरे हा एक मोठा मुद्दा होता. यावर उपाय म्हणून महापालिकेने १६७ डेकोरेटिव्ह पोल बसवून प्रकाशयोजना सुधारली. यामुळे उद्यानांचा एकूण माहोल सुखद झाला असून रात्रीही लोक निर्धास्तपणे फिरू शकतात.

3 कोटींचा खर्च आणि नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद…
या संपूर्ण प्रकल्पावर 3 कोटींचा खर्च झाला आहे. नवीन सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजनांमुळे उद्यानांचा चेहरामोहरा बदलला असून नागरिकांनी याचे स्वागत केले आहे. काही उद्यानांत रात्रीच्या वेळेत वाढलेली गस्त आणि सीसीटीव्हीची जोड मिळाल्याने असामाजिक प्रकार रोखण्यास मोठी मदत होणार असल्याची प्रतिक्रियाही अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

या उद्यानांमध्ये बसवण्यात आलेत १७९ सीसीटीव्ही कॅमेरे
शेनाळे तलाव, कल्याण
नाना धर्माधिकारी उद्यान, कल्याण
रमाबाई आंबेडकर उद्यान, कल्याण
रुक्मिणीबाई दवाखाना परिसर, कल्याण
मिनाताई ठाकरे उद्यान, डोंबिवली
सावित्रीबाई फुले रंगमंदिर, डोंबिवली
क्रीडासंकुल तरण तलाव, डोंबिवली
आनंदनगर उद्यान
भागशाळा मैदान, डोंबिवली

या उद्यानात उभारण्यात आलीय डेकोरेटिव्ह पोल – प्रकाश व्यवस्था

कारभारी उद्यान, कल्याण
धर्मवीर आनंद दिघे उद्यान, कल्याण
नाना धर्माधिकारी उद्यान, कल्याण
चौधरी मोहल्ला उद्यान, कल्याण
सावरकर उद्यान, डोंबिवली
नाना-नानी पार्क, डोंबिवली
मिनाताई ठाकरे उद्यान, डोंबिवली

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा