Home ठळक बातम्या कल्याण पश्चिमेतील जनता शिवसेना–भाजप युतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील – आमदार विश्वनाथ...

कल्याण पश्चिमेतील जनता शिवसेना–भाजप युतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील – आमदार विश्वनाथ भोईर

कल्याण दि.13 जानेवारी :
कल्याण पश्चिमेत शिवसेना आणि भाजप महायुतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, संघटनात्मक ताकद आणि अनुभवी नेतृत्वाच्या जोरावर विजयाचा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आमदार भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला आहे. (People of Kalyan West Will Stand Firmly with the Shiv Sena–BJP Alliance – MLA Vishwanath Bhoir)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेना–भाजप युतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ठाकरे गट आणि मनसे यांना विधानसभा निवडणुकीतच पराभवाचा सामना करावा लागला असल्याने त्यांचा धोका आता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत “आव्हान असल्याचे कुठेही वाटत नाही. काही प्रभागांत अपवादात्मक परिस्थिती असू शकते; मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कल्याण डोंबिवलीवर बारीक लक्ष आहे. आमची टीम अत्यंत तगडी असून मैदानात पूर्ण ताकदीने उतरली आहे. त्यामुळे कोणाचेही आव्हान वाटत नाही,” असेही आमदार भोईर यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “गेली अनेक वर्षे शिवसेनेवर प्रेम करणारे मतदार आमच्यासोबत आहेत. आम्ही त्यांच्याशी कधीही अंतर ठेवलेले नाही. मतदार आमच्यापासून लांब नाहीत. इतकी वर्षे तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात, आताही तीच साथ द्या असे आवाहन करतानाच कल्याण पश्चिमेतील जनता शिवसेना–भाजप युतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.”

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा