Home ठळक बातम्या उमेदवाराच्या पतीवरील जीवघेण्या हल्ल्याविरोधात डोंबिवलीत भाजपाचा मूकमोर्चा

उमेदवाराच्या पतीवरील जीवघेण्या हल्ल्याविरोधात डोंबिवलीत भाजपाचा मूकमोर्चा

डोंबिवली दि.13 जानेवारी :
डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजप उमेदवाराच्या पतीवर र झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाकडून मुकमोर्चा काढून निषेध करण्यात आला. याठिकाणी मतदारांना पैसे वाटपाच्या कथित आरोपांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. (BJP Holds Silent March in Dombivli Against Deadly Attack on Candidate)

अशातच काल रात्री भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादामध्ये भाजप महिला उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा आज भाजपकडून मुकमोर्चा काढून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध, जस्टिस फॉर ओमनाथ नाटेकर अशा आशयाचे फलक यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हातात होते.

दरम्यान ओमनाथ नाटेकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित दोन आरोपीही या वादात जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा