
कोणाचे होणार तोंड गोड तर कोणावर येणार संक्रांत याची उत्सुकता शिगेला
कल्याण डोंबिवली दि.14 जानेवारी :
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या केडीएमसी निवडणुकीचा सोहळा आता अंतिम टप्प्यात आला असून मतदार राजा कोणाचे तोंड गोड करणार आणि कोणावर संक्रांत येणार याचा फैसला अवघ्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. केडीएमसी निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून कल्याण डोंबिवलीतील 382 ठिकाणी 1 हजार 548 मतदान केंद्रांच्या माध्यमातून निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. केडीएमसीच्या इतिहासात यंदा प्रथमच पॅनल पद्धतीने ही निवडणूक होत असून कल्याण डोंबिवलीतील मतदार राजा त्याला कसा प्रतिसाद देतोय हे उद्या स्पष्ट होईल. (Administration Gears Up for KDMC Elections; Voting Tomorrow at 1,548 Polling Booths Across 382 Locations in Kalyan-Dombivli)
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एकुण 14 लाख 25 हजार 86 इतके मतदार सूज त्यामध्ये 7 लाख 45 हजार 664 पुरुष मतदार, तर 6 लाख 78 हजार 870 स्त्री मतदार आणि इतर मतदारांची संख्या 552 इतकी आहे. या सार्वत्रिक निवडणूकीत 31 पॅनलम असून पहिल्यांदाच बहुसदस्य पध्दतीने ही निवडणूक संपन्न होणार आहे. या निवडणूकीसाठी 1हजार 548 मतदान केंद्रांवर आणि 382 ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. यापैकी 1 हजार 13 मतदान केंद्रे तळमजल्यावर, 9 मतदान केंद्रे पहिला मजल्यावर, 471 मतदान केंद्रे पार्टीशन स्वरुपात तर 55 मतदान केंद्र ही मंडपात असणार आहेत.
पहिल्यादांच निवडणूक विभागनिहाय होणार मतमोजणी…
पॅनल पद्धतीसोबतच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक विभागनिहाय मतमोजणी केली जाणार आहे. केडीएमसी निवडणुकीसाठी 9 विभाग निश्चित करण्यात आले असून 8 ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. यातही निवडणूक विभाग क्रमांक 2 आणि 4 मतमोजणी ही एकाच ठिकाणी केली जाईल.
याठिकाणी होणार मतमोजणी
1. निवडणूक निर्णय अधिकारी – 1 यांचेकडील पॅनल क्रमांक – 2, 3 व 4 ची मतमोजणी बिर्ला वन्य, केडीएमटी इमारत, तळ मजला, शहाड (पश्चिम).
2. निवडणूक निर्णय अधिकारी – 2 यांचेकडील पॅनल क्रमांक – 1, 5, 6 व 10 ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम)
3. निवडणूक निर्णय अधिकारी – 3 यांचेकडील पॅनल क्रमांक – 7, 8 व 9 ची मतमोजणी प्रभाग क्षेत्र 3/क चे कार्यालय, तळ मजल्यावरील वाहन पार्किंग क्षेत्र, आधारवाडी, कल्याण (पश्चिम).
4. निवडणूक निर्णय अधिकारी – 4 यांचेकडील पॅनल क्रमांक – 11, 12 व 18 ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ यांचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा, कल्याण (पश्चिम).
5. निवडणूक निर्णय अधिकारी – 5 यांचेकडील पॅनल क्रमांक – 13, 14, 15 व 16 ची मतमोजणी साकेत कॉलेज, 100 फुटी रस्ता, राम म्हात्रे चौक, काटेमानिवली, कल्याण (पूर्व).
6. निवडणूक निर्णय अधिकारी – 6 यांचेकडील पॅनल क्रमांक – 20, 26, 27 व 28 ची मतमोजणी आयईएस पाटकर विद्यालय, राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व) या शाळेच्या स्टील्ट हॉलमध्ये.
7. निवडणूक निर्णय अधिकारी – 7 यांचेकडील पॅनल क्रमांक – 21, 22, 23 व 25 ची मतमोजणी कडोंमपा शाळा क्र. 20, रेती बंदर रोड, मोठा गांव, डोंबिवली (पश्चिम).
8. निवडणूक निर्णय अधिकारी – 8 यांचेकडील पॅनल क्रमांक – 29 व 30 ची मतमोजणी धनजी नानजी चौधरी विद्यालय हॉल, पहिला मजला, नांदीवली, डोंबिवली (पूर्व).
9. निवडणूक निर्णय अधिकारी – 9 यांचेकडील पॅनल क्रमांक – 17, 19 व 31 ची मतमोजणी सावित्रीबाई फुले कलामंदिर, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व).

























