
पॅनल क्रमांक १२ मधील सचिन पोटे, सरिता निकम, डॉ. ऐश्वर्या तांबोळी, प्रमोद पिंगळे यांच्यासाठी प्रचार रॅली
कल्याण दि.8 जानेवारी :
कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक 12 मधील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पॅनल क्रमांक १२ मधील सचिन पोटे, सरिता निकम, डॉ. ऐश्वर्या तांबोळी, प्रमोद पिंगळे यांच्यासाठी ही प्रचार रॅली काढण्यात आली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले की केडीएमसी निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. (A massive roadshow in Panel No. 12, Kalyan East showcased the strength of the Mahayuti alliance. Expressing confidence, Dr. Shrikant Shinde stated that all Mahayuti candidates will emerge victorious)
कल्याण डोंबिवलीमध्ये सगळीकडेच आम्हाला लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,असे ते म्हणाले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या कल्याण डोंबिवली दौऱ्यामध्ये मनसेच्या उमेदवारांना विचारले की काही दबाव आहे का? याबाबत विचारले असता विचारले असता खा. डॉ. शिंदे यांनी त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देत राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्याबाबत विचारणा करावी असे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांच्या, उमेदवारांच्या मागे नेत्यांनी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते. त्यावेळी उमेदवार पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरतो. त्यांचे नेतेच घराबाहेर पडत नाहीत मग त्यांचे उमेदवार कसे टिकणार असा टोलाही लगावला.
यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, भाजपचे प्रचार प्रमुख नाना सूर्यवंशी, पॅनल क्रमांक १२ मधील सचिन पोटे, सरिता निकम, डॉ. ऐश्वर्या तांबोळी, प्रमोद पिंगळे यांच्यासह निलेश शिंदे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























