
डोंबिवली दि.14 डिसेंबर :
भारतीय जनता पक्षातर्फे डोंबिवली पश्चिमेतील जय हिंद कॉलनी परिसरात आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी हृदयनाथ भोईर आणि हर्षदा भोईर यांच्याकडून आयोजित या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामध्ये सुमारे 500 हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. (BJP Organises Free Maha Arogya Health Camp in Dombivli’s Jai Hind Colony; Overwhelming Response from Citizens)
या महाआरोग्य शिबिरामध्ये संपूर्ण वैद्यकीय तपासणी, स्त्रीरोग तपासणी, लहान मुलांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, युरोलॉजी, हिमोग्लोबिन – ब्लड शुगर, रक्तदाब यांच्यासह बोन डेन्सिटी टेस्टही यावेळी करण्यात आली. याशिवाय 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी अतिशय महत्त्वाची असणारी सर्वायकल कॅन्सरची लसही या शिबिरात सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आयोजक आणि माजी नगरसेविका हर्षदा भोईर यांनी दिली.

तर हे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी आयुष हॉस्पिटल, लाईफब्लिस क्लिनिक, सुखकर्ता हॉस्पिटल, पानसरे पॅथोलॉजी, जी. एम. युरोकेअर हॉस्पिटल, ईशा नेत्रालय, सेफ क्लिनिक आणि प्रणिषा हेल्थकेअर यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या राबवण्यात आले.
या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रियाताई जोशी, माजी ज्येष्ठ नगरसेवक नंदू म्हात्रे, प्रकाश भोईर, महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह प्रभागातील अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























